ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 20 - सोशल मिडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक कॉमेडी व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. खरं तर घटना गंभीर आहे पण व्हिडिओ पाहताना हसून हसून पोट दुखू लागतं. नुकतंच लग्न करुन दुचाकीवरुन निघालेली नववधू बाईकवरुन पडतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
लग्न झालं की मनात फुटणारे लाडू आणि घरी जाण्याची लागलेली घाई नवरदेवाला इतकी झाली होती की त्याला आपली बायको बाईकवरुन पडल्याचंदेखील लक्षात आलं नाही. दुचाकीवरुन चाललेलं हे जोडपं आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न पाहतं चाललं होतं. समोर आलेल्या स्पीडब्रेकरवरुन नवरदेवांनी जोराने गाडी नेली आणि मागे बसलेल्या नववधूचा बॅलेन्स गेला आणि रस्त्यावर पडली.
इथपर्यंत सर्व गंभीर वाटतं. पण आपली नववधू खाली पडली आहे हे या महाशयांच्या लक्षातच आलं नाही आणि ते एकटेच आपल्या आयुष्याची सुरुवात करायला निघून गेले. नववधू खाली पडल्यानंतर जवळच्या लोकांनी येऊन तिला मदत केली. यांनी आत्ताच साथ सोडली, मग पुढे काय होणार असाचं विचार ही नववधू करत घरी गेली असावी.