ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 10 - ऑस्ट्रेलियामधील एका सर्प पकडणा-या संस्थेने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सापाने गिळलेला टेनिस बॉल बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र त्याला मसाज करताना दिसत आहे. 8 फेब्रुवारीला शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटीहून जास्त लोकांनी पाहिला असून दिड हजाराहून जास्त जणांनी शेअर केला आहे.
टाऊन्सविले स्नेकहॅण्डलर या संस्थेने आपल्या फेसबूक पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका घरमालकाने या सापाला पाहिल्यानंतर माहिती पाठवली. सापाला पकडल्यानंतर त्यांच्या पथकाने एक्स-रे काढून नेमकं काय गिळलं आहे याची तपासणी केली असता टेनिस बॉल असल्याचं लक्षात आलं. बॉल जास्त आत गेला नसल्याने टीमने बॉल बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सापाला मसाज देऊन बॉल बाहेर काढण्यात आला. यासाठी 20 मिनिटे लागली.