काबुल:अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान स्वतःला बदललत असल्याचं ढोंग करत आहे, याचं ताजं उदाहरण कॅमेऱ्यात कैद झालंय. काबुलमध्ये एका टीव्ही शोमदरमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची एंट्री झाली आणि शोच्या अँकरला गन पॉईंटवर मुलाखत घ्यावी लागली. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूज स्टुडियोमध्ये तालिबान कमांडर कारी समिउल्लाहची मुलाखत सुरू होती. यावेळी त्याच्यासोत इतर सात तालिबानी दहशतवादी AK-47 बंदुका घेऊन आले. या संपूर्ण मुलाखतीदरम्यान हे सात जण तिथेच अँकरच्या मागे उभे होते. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुनच अफगाणिस्तानातील येणारी परिस्थिती कशी असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
आता तुम्ही म्हणाल की, त्यात काय विशेष आहे. तालिबान ही एक दहशतवादी संघटना आहे, ते जिथे जातील तिथे फुले किंवा हार घालून जाणार नाहीत, बंदुकाच घेऊन जातील. पण, या हा व्हिडिओ इतका व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, ज्या शोमध्ये ही मुलाखत सुरू होती.,त्या शोमध्ये तालिबानी नेता शांती प्रस्थापित करण्याचा मुद्दा घेऊन गेला होता. अफगाणिस्तानातील प्रत्येकाच्या सुरक्षेचं आश्वासन देण्यासाठी गेला होता. ज्या शोमध्ये तो हा तालिबानी नेता सहभागी झाला होता, त्याचे नावंही पीस स्टुडिओ(PEACE STUDIO) होतं. PEACE म्हणजे शांतता, पण या मुलाखतीत शस्त्रांचं खुले प्रदर्शन पाहून, तालिबानमुळे शांतता प्रस्थापित होईल ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.