वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणावेळी त्यांच्या भाषणाचा कागदच फाडून टाकला आहे. ट्रम्प वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांचे तिसरे 'स्टेट ऑफ द यूनियन अॅड्रेस' भाषण देत होते. नॅन्सी या त्यांच्या पाठीमागेच उभ्या राहून भाषणाचा कागद फाडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर लोक टाळ्या वाजवत होते आणि त्यांच्या पाठीमागे नॅन्सी कागद फाडत होत्या. हे करताना त्यांना ट्रम्प यांनी पाहिले नव्हते. नॅन्सी या व्हाईट हाऊसच्या स्पीकर आहेत. या कृत्याबद्दल नॅन्सी यांना जेव्हा कारण विचारले गेले तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितले की, हाच पर्याय योग्य होता. हे एक खूपच टुकार भाषण होते.
यावर व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया देताना हा तिचा वारसाच असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. याआधी त्यांनी सदस्यांना संबोधित केले. राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात अमेरिका एवढ्या वेगाने पुढे गेलीय की काही वर्षांपूर्वी कल्पना करणेही कठीण होते.
राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळविण्य़ासाठी ट्रम्प यांनी दोन्ही सदनांच्या सदस्यांना सांगितले की, अमेरिकेचे मोठे, चांगले आणि पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होण्याचे स्वप्न परत आले आहे. यावेळी त्यांनी तीन वर्षातील केलेली कामे सांगितली.