उगांडा - उगांडाचे उप पंतप्रधान मोसेस अली यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये फुटबॉलला किक मारताना खाली पडल्याचे दिसत आहे.
जगभरात फुटबॉल सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. फिफा स्पर्धेनंतर आता काही देशामध्ये फुटबॉलचे सामने होताना दिसतात. अशाप्रकारे उगांडामधील नाम्बूले नॅशनल स्टेडियममध्ये सुद्धा फुटबॉलच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उगांडाचे उप पंतप्रधान मोसेस अली यांनी आमंत्रित करण्यात आले होते.
या स्पर्धेची सुरुवात मोसेस अली यांनी फुटबॉलला किक मारुन केली. यावेळी मोसेस अली यांनी फुटबॉलची किक मारली. परंतू त्याच्या पायातील शूज हवेत उडाला आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मदतीचा हात दिला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.