शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
2
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
4
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
5
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
6
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
7
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
9
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
10
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
11
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
12
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
13
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
14
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
15
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
16
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
17
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
18
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
19
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
20
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर

VIDEO - समजून घ्या अमेरिकेच्या घातक GBU-43 बॉम्बच्या स्फोटाचे परिणाम

By admin | Published: April 14, 2017 12:54 PM

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ख-या अर्थाने दहशतवादाविरुद्ध लढाई सुरु केली.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. 14 - अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ख-या अर्थाने दहशतवादाविरुद्ध लढाई सुरु केली. या लढाईत अमेरिकेने गुरुवारी प्रथमच आपल्या शक्तीशाली  GBU-43 अस्त्राचा वापर करुन संपूर्ण जगाला धक्का दिला. अणवस्त्रविरहीत अमेरिकेचा हा सर्वात शक्तीशाली बॉम्ब आहे. अणूबॉम्ब प्रमाणे या  बॉम्बमुळे पुढच्या पिढयांमध्ये शारीरीक व्यंग निर्माण होणार नसले तरी, प्रचंड विध्वंस घडवण्याची क्षमता यामध्ये नक्कीच आहे. 
 
अमेरिकेने अफगाणिस्तानच्या पूर्वभागात इसिसचे तळ नष्ट करण्यासाठी 21 हजार पाऊंडसचा हा बॉम्ब फेकला. जाणून घेऊया GBU-43 बद्दल 
 
- GBU-43 बॉम्बची सर्वप्रथम मार्च 2003 मध्ये चाचणी घेण्यात आली. इराक युद्ध सुरु होण्याच्या काही दिवस आधी ही चाचणी घेण्यात आली. इराककडे रासायनिक शस्त्र असल्याचा दावा करुन अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी इराकवर हल्ला केला. 
- 21 हजार पाऊंड म्हणजे 9525 किलो वजनाचा हा बॉम्ब होता. 
- या बॉम्बची लांबी 30 फूट असून, 40.5 इंच व्यास आहे. 
- हा सॅटलाईड गाईडेड स्मार्टबॉम्ब असल्यामुळे यामध्ये अचूकता जास्त असते. जमिनीपासून 6 मीटर उंचीवर हवेतच या बॉम्बचा स्फोट होता. त्यामुळे याची परिणामकारकता जास्त असते. 
- GBU-43 ची "मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अशी ओळख असली तरी, हा सर्वात मोठा बॉम्ब नाही. T-12a हा 19800 किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा बॉम्ब आहे. क्लाऊडमेकर म्हणून हा बॉम्ब ओळखला जातो. 
- मदर ऑफ ऑल बॉम्ब GBU-43 च्या तुलनेत अणू बॉम्बचे वजन कमी असते. जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेला अणूबॉम्ब 14,500 टनाचा होता.
-  GBU-43 स्फोटानंतर १ हजार यार्डामध्ये आगीच्या ज्वाळा पसरतात.
 
- १ मैल परिसरातील लोकांना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाइट्स, वाहने यांना मोठी झळ, हादऱ्याने मृत्यू.
 
- १.७ मैल परिसरातील लोकांचा धक्क्याने मृत्यू होऊ शकतो. अनेक घरांना/इमारतींना तडे जाऊ शकतात.
 
- २ मैल परिसरातील लोकांना आवाजाने बहिरेपण येऊ शकते.
 
- ५ मैल परिसरात भूकंपसदृश धक्के बसतात.
 
- ३0 मैल परिसरातून या बॉम्बच्या १० हजार फूट उंच पोहोचलेल्या मशरूमच्या आकाराचे धूराचे लोळ दिसतात.
 
या स्फोटाचे राजकीय जगात परिणाम काय?
 
- अमेरिकेशी कटुता असणाऱ्या रशियावर मोठा दबाव.
 
- दक्षिण चीन समुद्रावर दावा करणाऱ्या चीनला इशारा.
 
- बॉम्बखोर उत्तर कोरियाला अमेरिकेने शक्ती दाखवली.
 
- दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानला मोठा इशारा.