Pakistan Shehbaz Sharif: पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याआधी माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रचाराला सुरुवात केली. पण इम्रान खान यांच्यानंतर ज्या पद्धतीने शाहबाज यांनी पाकिस्तानलापंतप्रधान म्हणून एका वर्षाहून अधिक काळ हाताळले, त्यावर लोक तीव्र नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता शाहबाज यांना रस्त्यावर प्रचार करणेही कठीण झाले आहे. शाहबाज शरीफ बुधवारी लाहोरला पोहोचले तेव्हा त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानमधील सुशासनाचा अभाव आणि प्रचंड भ्रष्टाचार यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्यांना खूप सुनावले.
शाहबाज शरीफ आपल्या कारमध्ये लाहोरला पोहोचले तेव्हा लोकांनी त्यांना घेरले. शाहबाज शरीफ यांच्या गाडीच्या बोनेटवर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या. लोक मात्र संतप्तपणे यावर हात मारत होते. तेथे काही तरुण होते जे शाहबाज यांना अपशब्द बोलत होते. तेथे उपस्थित काही लोकांनी जमावाला शांत राहण्यास सांगितले, पण त्याचा फारसा फरक पडताना दिसला नाही. लोक संतापाच्या भरात सतत वाहनांवर हात मारताना दिसले. एका वेळी असी परिस्थिती आली की शाहबाज यांना कारमधून बाहेर निघणंही मुश्किल झालं. पाकिस्तानात उद्भवलेल्या प्रचंड महागाईच्या समस्येबाबत ते नाराज असल्याचे दिसून आले.