लंडन : भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज येथील न्यायालयात विजय माल्या हजर झाला होता. यावेळी त्याने भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. बँकांना कोट्यावधींचा गंडा घालून गेलेल्या विजय माल्याला भारताच्या स्वाधीन केले जावे, यासाठी भारत सरकारकडून गेल्या वर्षी ब्रिटेनकडे अर्ज करण्यात आला होता. याला ब्रिटेनकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यासंबंधीचा सर्व प्रक्रियांची सुरुवात देखील करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी आज येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात विजय माल्ला हजर झाला होता. यावेळी न्यायालयात त्याने आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे सांगत भारतात आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणीदरम्यान, भारताकडून त्याच्या सुरक्षेबाबत भूमिका मांडण्यात येणार आहे.
विजय माल्या म्हणाला, भारतात माझ्या जीवाला धोका आहे....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 6:35 PM
भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज येथील न्यायालयात विजय माल्या हजर झाला होता. यावेळी त्याने भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.
ठळक मुद्देभारतात माझ्या जीवाला धोकामाझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे बँकांकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज