लंडन - भारत सरकारने फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याला ब्रिटिश हायकोर्टाने मोठा झटका बसला आहे. ब्रिटनच्या हायकोर्टाने विजय मल्ल्यालाभारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही आणि तो 28 दिवसांत भारताकडे सोपवला जाऊ शकतो.युकेच्या गृहसचिवांना मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कागदावर 28 दिवसांत सही करावी लागेल. यानंतर युकेचा संबंधित विभाग मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधतील. ब्रिटिश हायकोर्टाने गेल्या महिन्यात विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली होती.किंगफिशर एअरलाइन्सने भारतातील अनेक बँकांकडून घेतलेल्या ९००० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यासाठी विजय मल्ल्या हा आरोपी आहे.हायकोर्टाच्या या निर्णयानंतर मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याबाबत हे प्रकरण आता गृहसचिव प्रीती पटेल यांच्याकडे जाणार होता. ३१ मार्च रोजी मल्ल्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी बँकांना त्यांचे पूर्ण पैसे देण्याची सातत्याने ऑफर केली आहे. ना बँका पैसे घेण्यास तयार झाल्या, ना ईडी (अंमलबाजवणी संचालनालय) संपत्ती सोडण्यास तयार झाली आहे . यावेळी अर्थमंत्री माझे म्हणणे ऐकतील अशी माझी इच्छा आहे.'
विजय मल्ल्याला ब्रिटिश हायकोर्टाचा मोठा झटका बसला आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना भारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देणारी याचिका फेटाळली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही आणि मल्ल्या 28 दिवसांत भारतात सोपवला जाऊ शकतो. युकेच्या गृहसचिवांना मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कागदावर 28 दिवसांत सही करावी लागेल. यानंतर युकेचा संबंधित विभाग मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधेल. ब्रिटिश हायकोर्टाने गेल्या महिन्यात विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली होती. किंगफिशर एअरलाइन्सने भारतातील अनेक बँकांकडून घेतलेल्या ९००० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यासाठी विजय मल्ल्या हा आरोपी आहे.हायकोर्टाच्या या निर्णयानंतर मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याबाबत हे प्रकरण आता गृहसचिव प्रीती पटेल यांच्याकडे जाणार होते. ३१ मार्च रोजी मल्ल्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'मी बँकांना त्यांचे पूर्ण पैसे देण्याची सातत्याने ऑफर केली आहे. ना बँका पैसे घेण्यास तयार झाल्या, ना ईडी (अंमलबाजवणी संचालनालय) संपत्ती सोडण्यास तयार झाली आहे. यावेळी अर्थमंत्री माझे म्हणणे ऐकतील अशी माझी इच्छा आहे.'कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा (मंगळवारी) आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उद्योग जगतातल्या अनेकांनी या पॅकेजचं स्वागत केलं आहे. यानंतर आता कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानंदेखील सरकारचं अभिनंदन केलं आहे.सीबीआय आणि ईडीला आशा आहे की येत्या 28 दिवसांत मल्ल्याला भारताकडे सोपवले जाईल.
आणखी बातम्या वाचा...
CoronaVirus: मला बी योगदान देऊ द्या की; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस
Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल
लज्जास्पद! पतीने केला पत्नीचा सौदा, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी तिला सोपवले परपुरुषांकडे
विजय मल्ल्याला कोर्टाने दिला दणका, अपील लावले फेटाळून