ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. १७ - एखाद्या ठिकाणी साप असतो असे कोणी सांगितले तर, माणस पुन्हा त्या दिशेला जाण्याच धाडस करत नाही. सापापासून चार पावलं दूर रहाण्यातच आपली भलाई मानतात. पण चीनची राजधानी बिजींगमधील एका गावात विषारी साप पाळण्याची परंपरा आहे.
'जिसिकियाओ' नावाच्या गावात वर्षभरात ३० लाख साप जन्म घेतात. या गावाची लोकसंख्या फक्त १ हजार आहे. पण गावातील प्रत्येक घरामध्ये तुम्हाला विषारी साप सापडतील. अजगर, कोब्रा, वायपरसारखे विषारी साप इथे पाळले जातात.
फक्त आवड म्हणून नव्हे तर, व्यवसाय म्हणून इथे साप पाळले जातात. औषधांच्या निर्मितीसाठी सापाच्या विविध भागांची या गावात विक्री होते. या गावातील लोक अजगर, कोब्रा, वायपर या विषारी सापांना घाबरत नाहीत पण फाईव्ह स्टेप नावाच्या सापाला घाबरतात. हा साप चावला तर अवघी पाच पावल चालल्यानंतर तुमचा मृत्यू होतो.