मिनीपोलीस : अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यातील एका अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुरू झालेली निदर्शने मिनी पोलीस क्षेत्राच्या बाहेरही पसरली आहेत. निदर्शकांनी सेंट पॉल मार्गावर लुटमार व जाळपोळ केली, तसेच ते यापूर्वी हिंसक निदर्शने झालेल्या जागीही गेले, जेथे आधीच मोठे नुकसान झालेले होते.
आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस ठाण्याला आग लावली असून, नंतर ते ठाणे रिकामे करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रेसिंक्ट पोलीस ठाणे तातडीने रिकामे करण्यात आले. एका व्हिडिओमध्ये निदर्शक पोलीस ठाण्यात घुसताना व इमारतीला आग लावताना दिसत आहेत.
अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्थितीवर - नेतृत्वाचा पूर्ण अभाव - अशी टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आताच गव्हर्नर टिम वाल्ज यांच्याशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे आहे की, लष्कर त्यांच्यासमवेत आहे. लुटालूट सुरू होताना गोळीबारही होत आहे.
फ्लोयडच्या मृत्यूनंतर सलग तिसºया रात्रीही निदर्शने झाली. लुटमारीपासून वाचण्यासाठी व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या खिडक्या, दारे बंद केल्या. अमेरिकेतील एका कंपनीने आपले दोन डझनावर स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली आहे.
पोलीस अधिकाºयाने मानेवर गुडघा ठेवला
च्जॉर्ज फ्लोयड या हातकड्या घातलेल्या व्यक्तीच्या मानेवर एका पोलीस अधिकाºयाने गुडघा ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला होता. संबंधित अधिकारी किमान ८ मिनिटे त्या व्यक्तीच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडिओ दिसत आहे.च्या कालावधीत ती व्यक्ती श्वास थांबल्याचे म्हणताना दिसत आहे. मागील सोमवारी घडलेल्या या घटनेतील व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीची हालचाल, बोलणे बंद झाल्यावरही पोलीस अधिकारी गुडघा हटवत नाही.