शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

तंत्रज्ञानाची कमाल! रोबोटने केलं ऑपरेशन; सहजतेने केली डॉक्टरांना अवघड वाटणारी सर्जरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 12:35 PM

आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक उपकरणांचा वापर करून हे ऑपरेशन केलं जातं.

नवी दिल्ली - तंत्रज्ञान जसजसं विकसित होत आहे, तसतशी माणसापुढील आव्हानेही वाढत आहेत. काहीवेळा मशीन अशा गोष्टी करण्यास मदत करतात ज्या करणं माणसांसाठी देखील खूप अवघड असतं. अशीच एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच हैराण केलं आहे. विज्ञानाचा आविष्कार पाहायला मिळाला आहे. यात एका रोबोटने डुकराचं यशस्वीपणे ऑपरेशन केलं आहे (Robot Performs Surgery on Pig). सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. 

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बनवलेल्या स्मार्ट टिश्यू ऑटोनॉमस रोबोट (Smart Tissue Autonomous Robot) अर्थात STAR ने नुकताच एक चमत्कार केला आहे. या रोबोटने डुकराची यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये त्याला कोणत्याही माणसाने थेट मदत केलेली नाही. रोबोटिक्सच्या दिशेने या ऑपरेशनकडं मोठं यश म्हणून पाहिलं जात आहे.

शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी खूपच गुंतागुंतीची 

डेली स्टार वेबसाईटच्या वृत्तानुसार, ही शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती, ज्यामध्ये डुकराच्या आतड्याचे दोन कोपरे एकमेकांना जोडावे लागले. रिपोर्टनुसार ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी खूपच गुंतागुंतीची आहे. याचा धोकाही खूप जास्त असतो कारण शस्त्रक्रियेदरम्यान शल्यचिकित्सकाचा हात हालला किंवा चुकीच्या ठिकाणी टाके टाकले गेले तर जीवाचा मृत्यूही होऊ शकतो. या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये यंत्रमानव वापरण्याचा फायदा म्हणजे तीच क्रिया पुन्हा पुन्हा केली तरी त्यांचे हात हालत नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक उपकरणांचा वापर करून हे ऑपरेशन केलं जातं.

ऑपरेशन करू शकतील यासाठी रोबोट्स सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू 

प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले डॉक्टर क्रिगर यांनी आपल्या निवेदनात सांगितलं की, स्टार रोबोटने ही संपूर्ण प्रक्रिया 4 प्राण्यांवर अगदी सहजपणे पार पाडली आणि या प्रक्रियेचे परिणाम माणसाने केलेल्या शस्त्रक्रियेपेक्षा चांगले असल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी अजूनही मानवांच्या सुपरव्हिजनची आवश्यकता आहे. आता मानवी मदतीशिवाय ते ऑपरेशन करू शकतील यासाठी रोबोट्स पूर्णपणे सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे की यामुळे त्यांची नोकरी आणि अनेक वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन घेतलेलं ज्ञान धोक्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.