Amazon Viral Video: अमेरिकेतील (America) फ्लोरिडामध्ये (Florida) एक महिला डिलेव्हरी व्हॅनमधून बाहेर येत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एका अॅमेझॉन ड्राव्हरला काढून टाकण्यात आलं आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ डायलन हुकने रेकॉर्ड केला होता. ज्यात दिसलं की, एक महिला रस्त्यावर उभ्या व्हॅनमधून बाहेर निघत आहे. व्हिडीओमध्ये फ्लोरिडामध्ये एका रस्त्यावर अॅमेझॉन व्हॅन उभी आहे. काळ्या रंगाच्या कपड्यातील महिला बाहेर येताना बघितल्यावर लोकांकडून अंदाज लावला जात आहे की, व्हॅनच्या आत काय सुरू होतं.
अॅमेझॉन डिलीव्हरी एजंट नेहमीच चांगल्या किंवा वाईट कारणांमुळे चर्चेत असतात. अॅमेझॉनच्या एका डिलीव्हरी व्हॅनच्या व्हिडीओची टिकटॉकवर खूप चर्चा होती. व्हिडीओत एक महिला अॅमेझॉन डिलीव्हरी व्हॅनच्या मागच्या दाराने बाहेर निघताना दिसत आहे. नेटिझन्स अंदाज लावत आहे की, तिथे काय सुरू होतं. हा व्हिडीओ अॅमेझॉनच्या प्रशासनाकडे पोहोचला आणि डिलीव्हरी एजंटला नोकरीहून काढलं.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे प्रवक्ता मारिया बोशेट्टी म्हणाले की, 'हे आमच्या डिलीव्हरी पार्टनर्स आणि त्यांच्या ड्रायव्हर्सच्या स्टॅंडर्डला दर्शवत नाही. अनधिकृत व्यक्तीला डिलीव्हरी व्हॅनमध्ये प्रवेश करून देणं हे पॉलिसीचं उल्लंघन आहे. आणि आता ड्रायव्हर आमच्यासोबत कार्यरत नाही'.
हा व्हिडीओ ट्विटरवर एक आठवड्याआधी २५ ऑक्टोबरला 'आय सीन्ट इट' नावाच्या यूजरने कॅप्शनसोबत शेअर केला होता. त्याने लिहिलं होतं की, 'अॅमेझॉन डिलीव्हरी ड्रायव्हर काही वेगळा आहे'. व्हिडीओवर प्रतिक्रिया देत यूजर्सनी रहस्यमय महिला आणि व्हॅनमध्ये झालेल्या घटनेबाबत आपापली मते मांडली आहेत.