वॉशिंग्टन : व्हिसा शुल्काच्या वाढीने भारतीय आयटी कंपन्यांवर विपरीत परिणाम झाला असला तरीही ती तशी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.येथे दौऱ्यावर आलेले भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी द्विपक्षीय चर्चेत व्हिसाचा प्रश्न उपस्थित केला होता आणि व्हिसा शुल्क वाढ पक्षपाती असल्याचे म्हटले होते. चर्चेत दोन मुद्दे उपस्थित झाले, त्यात व्हिसातील शुल्क वृद्धीचा एक मुद्दा आहे. आयटी व्यावसायिकांसाठी समग्र शुल्क लावण्याचा मुद्दा जुना आहे. त्यावर कायद्यानुसार आम्ही वृद्धी करतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्यात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण असेच कायम राहण्याची शक्यता आहे, असे जेटली म्हणाले. (वृत्तसंस्था)