वॉशिंग्टन : प्रमुख भारतीय कंपन्यांना डिसेंबर २०१५ पासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार सर्व प्रकारच्या एच-वन बी व्हिसासाठी अर्ज करताना किमान अतिरिक्त चार हजार डॉलर भरावे लागतील, असे वृत्त अमेरिकन एजन्सीने दिले.वृत्तानुसार एल-1 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना नव्या कायद्यानुसार अतिरिक्त ४,५०० डॉलर भरावे लागतील. हा कायदा ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. एच-1बी व्हिसा अंतर्गत अमेरिकन कंपन्यांना अमेरिकेत विशेष योग्यता प्राप्त विदेशी नोकरदारांना नियुक्त करण्याची मान्यता असेल तर एल-१ व्हिसा अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध असेल ज्यांचे कार्यालय अमेरिका आणि विदेशात अशा दोन्ही ठिकाणी आहे. अमेरिकेचा हा नवा कायदा भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी पक्षपाती असल्याची टीका केली आहे. या कायद्यामुळे कंपन्यांवर वर्षाला सुमारे ४० कोटी डॉलरचे ओझे पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वत: हा प्रश्न उच्चस्तरावर उपस्थित केला आहे. वाढीव व्हिसा शुल्काची माहिती नागरिकांसाठी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली आहे. एच-१ बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यास कंपनीचे अमेरिकेत ५० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर चार हजार डॉलर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. जे कर्मचारी एल-1 व्हिसासाठी अर्ज करतील त्यांना अतिरिक्त ४,५०० डॉलर भरावे लागतील.
व्हिसाचा खर्च वाढला
By admin | Published: May 28, 2016 1:27 AM