रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे जगातल्या सर्वात शक्तीशाली राष्ट्राध्यक्षांपैकी एक आहे. आता इतक्या मोठ्या माणसाचा थाटही कामी नसेल याची सर्वांनाच कल्पना आहे. पुतिन यांच्या विमानांची नेहमीच चर्चा होते. त्यांच्याकडे एक नाहीतर तब्बल चार प्रेसिडेंसियल विमाने आहेत. त्यातील एकाची फारच शाही आहे.
पुतिन यांचं IL-96-300PU जेट तब्बल 500 मिलियन डॉलर किंमतीचं आहे. चला जाणून घेऊया या विमानाबाबत काही खास गोष्टी...
भारतीय रूपयांमध्ये किंमत साधारण 34,28,75,00,000 इतकी असेल. म्हणजे एकूण ३४ अरब इतकी याची किंमत होत आहे. ४ हजार स्क्वेअऱ फूटचा कॅबिन एरीया असलेल्या या जेटमध्ये बेडरूम, मीटिंग रूम, किचन आणि जिम या सर्वच सुविधा आहेत.
या जेटचं इंटेरिअर फारच शानदार आहे. या विमानाची सुंदरता वाढवण्यासाठी यात सोन्याने काम करण्यात आलंय. जेटच्या जास्तीत जास्त भागांमध्ये गोल्ड प्लेटिंग केली गेली आहे.
या जेटमध्ये एक मिटींग रूमही तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून पुतिन हे त्यांच्या प्रशासनासोबत हजारो मीटरच्या उंचीवरूनही संपर्कात राहतात.
या जेटमध्ये पुतिन यांना आरामासाठी एक आरामदायक बेडरूमही तयार करण्यात आलंय.
पुतिन यांना व्यायाम करण्यासाठी या जेटमध्ये एक खास जिमही तयार करण्यात आलाय.
हे आहे या आलिशान जेटमधील आलिशान किचन...
हे जेट बाहेरून बघायला फारच साधं दिसतं. पण जेटच्या आतील सुंदरता कुणालाही थक्क करणारीच आहे. या जेटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक सुविधा आहेत.