शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, सध्या पूर्णपणे आहेत स्वस्थ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 2:07 PM

डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि त्यानंतर ते शुद्धीवर आले, असा दावा टेलिग्राम वाहिनीने दावा केला होता.

गेल्या दोन दिवसांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हृदयविकाराच्या बातम्या येत आहेत. व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ते आपल्या खोलीत जमिनीवर पडलेले आढळले. या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना उचलले, असे सांगितले जात आहे. दाव्यानुसार, व्लादिमीर पुतिन जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पूर्णपणे स्वस्थ आहेत आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला नाही.

रशियन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ७१ वर्षीय व्लादिमीर पुतिन दिवसभर क्रेमलिनमध्ये आपली ऑफिशिलय ड्युटी करत होते. व्लादिमीर पुतिन यांनी काल संध्याकाळी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशीही फोनवर चर्चा केली. तसेच,  व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील एका प्रदेशाच्या गव्हर्नरचीही भेट घेतली. यानंतर  व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराच्या झटक्याची बातमी सर्वप्रथम टेलिग्राम चॅनल - जनरल एसव्हीआरवर देण्यात आली होती, जी खोटी आहे.

व्लादिमीर पुतिन यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा जनरल एसव्हीआरने केला होता. व्लादिमीर पुतिन आपल्या हॉटेलच्या खोलीत बेडवरून जमिनीवर पडल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, त्यावेळी व्लादिमीर पुतिन जखमी झाले असून त्यांच्या नाकावर गंभीर जखमा दिसत होत्या, असाही दावा करण्यात आला होता. याचबरोबर, घटनेनंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी नंतर डॉक्टरांच्या टीमलाही बोलावले. डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि त्यानंतर ते शुद्धीवर आले, असा दावा टेलिग्राम वाहिनीने दावा केला होता.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, व्लादिमीर पुतिन यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जनरल एसव्हीआरच्या टेलिग्राम चॅनलवर एक मोठा लेख शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, मॉस्को टाईमनुसार रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी ते एका सुरक्षा रक्षकाला जमिनीवर पडलेले आढळले. सुरक्षा रक्षकांना त्यांचा पडण्याचा आवाज आला आणि ते त्यांच्या खोलीकडे पोहोचले, असे म्हटले जात आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला जात आहे, पण सूत्रांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून व्लादिमीर पुतिन यांनी हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया