रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन G-20 समिटसाठी बाली येथे जाणार नाहीत. यावरुन एका रशियन राजकीय विश्लेषकाने मोठा दावा केला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. राजकीय विश्लेषक सेरगे मारकोवने दावा केलाय की, पुतिन यांना आपली हत्या होण्याची भीती वाटत आहे. दरम्यान, यूक्रेनच्या खेरसोनमधून रशियान सैन्याने माघर घेतल्यामुळे, याला रशियाचा पराभव म्हटले जात आहे.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, मारकोवने लिहिले की, अमेरिक, ब्रिटेन आणि यूक्रेनची स्पेशल फोर्स व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचत असल्याची दाट शक्यता आहे. तसेच, जी-20 मीटिंगदरम्यान, त्यांचा अपमान करण्याचा कटही रचला जात असल्याची माहिती मारकोवने दिली. मार्कोव्ह हा रशियन सत्तेचा समर्थक मानला जातो.
मारकोवने असाही सल्ला दिला होता की, रशियाला विजय मिळवायचा असे, तर अर्थव्यवस्थेला मिल्ट्री सत्तेत बदलावे लागेल. हा निर्णय घेण्यासाठी 6 महिन्यांचा उशीर झाला आहे. आता रशियाला कडक निर्णय घ्यावे लागतील. आता देशातच ड्रोन्स आणि कॉम्युनिकेशन मिसाइल्सचे उत्पादन वाढवावे लागेल.