शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 7:02 AM

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध हेदखील पुतिन यांच्या तिरसट आणि हेकेखोर स्वभावाचीच परिणिती आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एक हेकेखोर, एककल्ली, तिरसट आणि आपल्याला वाटेल तेच करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. ते कोणत्या वेळी काय करतील याचा काहीही भरवसा नसतो. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध हेदखील पुतिन यांच्या तिरसट आणि हेकेखोर स्वभावाचीच परिणिती आहे.

त्यांचं सार्वजनिक, राजकीय जीवन जसं वादग्रस्त राहिलं आहे, तसंच त्यांची खासगी आयुष्यदेखील. त्यांचं खासगी आयुष्य तर जणू काही त्यांनी पोलादी पडद्याआड बंदिस्त करून टाकलं आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींनाही आजवर भोगावा लागला आहे. विशेषत: पुतिन यांच्या खासगी आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि त्यांच्यापासून त्यांना झालेली मुलं हा त्यांच्या देशातही कायम कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर

पुतिन सध्या ७२ वर्षांचे आहेत, पण त्यांच्या रंगेल स्वभावाचे किस्से आजही जगभर चर्चिले जातात. विशेष म्हणजे आपलं खासगी आयुष्य कधीच, कुठेच जगासमोर येणार नाही याची त्यांनी कायमच पुरेपूर काळजी घेतली, तरीही त्यांचं हे आयुष्य जगभर पसरलं. त्यांनी ते जेवढं झाकण्याचा प्रयत्न केला, तेवढी लोकांची, पत्रकारांची त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आणि ‘सत्य’ जगासमोर आलंच.

गर्लफ्रेंड एलिना कबेवा यांच्यापासून पुतिन यांना दोन मुलं आहेत. नुकतंच फोर्ब्सनं आपल्या रशियन तपास संस्थेच्या हवाल्यानं ही ‘खबर’ दिली आहे. पुतिन यांच्या या मुलांची वयं नऊ आणि पाच वर्षे आहेत. त्यांची नावं अनुक्रमे इवान आणि व्लादिमीर ज्युनिअर अशी आहेत.

मॉस्कोमध्ये अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ते राहतात. त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. इतकंच काय, ही मुलं आपल्या जन्मदात्या बापालाही भेटू शकत नाहीत. पुतिन यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते आपल्या या मुलांची भेट घेतात. त्यामुळे ही भेटही तुरळकच होते.

माध्यमांनी खणून काढलेल्या माहितीनुसार, पुतिन आणि एलिना कबेवा यांनी २००८ सालापासून एकमेकांना डेट करणं सुरू केलं. त्यानंतर सहा वर्षांनी पुतिन यांनी आपल्या अधिकृत पत्नीला घटस्फोट दिला. कबेवानं स्वीत्झर्लंडच्या एका मॅटर्निटी सेंटरमध्ये इवानला जन्म दिला, तर व्लादिमीर ज्युनिअरचा जन्म रशियातच मॉस्कोमध्ये झाला.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन या मुलांचा जन्म झाला. पण त्यांचं खासगी आणि सार्वजनिक आयुष्य मात्र जन्मापासून जणू कडीकुलपातच बंद आहे. प्रत्यक्ष जन्मदात्या बापाशी तर त्यांची सहज भेट होत नाहीच; पण त्यांच्या वयाच्या इतर मुलांशीही त्यांचा काहीही संपर्क नाहीये. बाकी राजेशाही थाट खूप आहे, मात्र लोकांमध्ये मिसळण्यापासून त्यांना बंदी आहे. ते त्यांच्या घरातच स्विमिंग, जिम्नॅस्टिक, संगीत शिकतात. त्यासाठीही त्यांना बाहेर जाता येत नाही. या सर्व गोष्टींसह इतरही अनेक गोष्टींसाठी त्यांना पर्सनल ट्रेनर ठेवण्यात आले आहेत. असं असतानाही इवाननं जिम्नॅस्टिकशी संबंधित काही स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आपले वडील पुतिन यांच्यासह हॉकीच्या काही मॅचेसही तो खेळला आहे.

पुतिन यांची गर्लफ्रेंड एलिना कबेवा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट आहे. आपल्या करिअरमध्ये तिनं दोन ऑलिम्पिक पदकं आणि इतरही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. याशिवाय ती एक राजकीय नेता आणि मीडिया मॅनेजरही आहे. अर्थात पुतिन यांनी कधीच आपल्या या संबंधांची कबुली दिलेली नाही किंवा त्याबद्दल जाहीर काही वाच्यता केलेली नाही.

पुतिन यांना आपल्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. आजवर अधिकृतपणे त्यांच्या याच संबंधांना त्यांनी मान्यता दिलेली आहे. बाकी संबंधांबद्दल मात्र त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. इतरही कोणाला ते त्याविषयी बोलू देत नाहीत आणि कोणी काही बोलायचा प्रयत्न केला, तर लगेच ते त्याचं तोंड दाबतात. ‘नको त्यांच्या वाटेला जायला’ म्हणून मीडियाही बऱ्याचदा त्यांना घाबरून असते. कारण त्यांना नकोशा असलेल्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे रशियातून आजवर अनेक पत्रकारही कायमचे ‘गायब’ झाले आहेत. ती आफत आपल्यावर ओढवू नये याची भीती पत्रकारांमध्ये कायमच असते.

गर्लफ्रेंडसाठी सोन्याचा महाल !

गेल्यावर्षी रशियन न्यूज वेबसाइट ‘द प्रोजेक्ट’नं दावा केला होता की, पुतिन यांनी एलिना कबेवा या आपल्या सिक्रेट गर्लफ्रेंडसाठी मॉस्कोपासून साधारण २५० मैल अंतरावर वलदाईच्या जंगलात एक आलिशान महाल तयार केला आहे. या महालात अनेक मोठमोठ्या हवेल्या आहेत. विशेष म्हणजे हा महाल सोन्याचा आहे. त्यातल्या अनेक गोष्टी सोन्याच्या आहेत. १३ हजार स्क्वेअर फुटांचा हा महाल साधारण १००० कोटी रुपयात तयार करण्यात आला होता.

टॅग्स :russiaरशिया