मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे मरण पावले असून त्याऐवजी त्यांचा तोतया सर्वत्र वावरत आहे, हा ब्रिटनच्या एमआय ६ या गुप्तचर संघटनेने केलेला खळबळजनक दावा रशियाने फेटाळून लावला आहे. पुतीन आजारी आहेत, या बातमीत काहीही तथ्य नाही. पुतीन यांच्याबद्दलच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे. लावरोव यांनी सांगितले की, पुतीन विविध प्रसंगी भाषणे करतात. त्यांना भाषणे करताना कोणीही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो. अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. (वृत्तसंस्था)
पुतीन यांचे ताजे छायाचित्र झळकलेव्लादिमीर पुतीन हे सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहकाऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांचे काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर झळकले आहे. पुतीन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे या छायाचित्रातून रशियाला सर्वांच्या मनावर बिंबवायचे आहे.
सिव्हिएरोडोनेत्स्कला वेढा रशियाने युक्रेनमधील सिव्हिएरोडोनेत्स्क या शहराच्या परिसरात प्रवेश केला आहे. त्या शहराला वेढा घालण्याच्या दृष्टीने रशियाने हालचाली सुरू केल्या आहेत. या शहरात युक्रेन व रशियाच्या फौजांमध्ये तुंबळ युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.