रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतिन यांना डॉक्टरांनी केवळ तीन वर्षांचा वेळ दिला आहे. त्यांचा कॅन्सर हळूहळू वाढत असून यामुळे त्यांची दृष्टीही कमकुवत होत आहे, असा दावा रशियाच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने केला आहे. खरे तर, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याच्या बातम्या, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकत आहेत. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पुतीन आजारी असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
सर्गेई म्हणाले, राष्ट्रपती पुतिन हे ठणठणीत आहेत. त्यांना कुठलाही आजार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, एफएसबीच्या एका अधिकाऱ्याने, यूकेमध्ये राहणारा रशियाचा माजी गुप्तहेर कारिपिकोव्हला संदेश पाठवून ही माहिती दिली होती.
या संदेशात लिहिले होते, की त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होतो, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. याशिवाय, ते जेव्हा टीव्हीवर येतात, तेव्हा त्यांना मोठ-मोठ्या अक्षरांत लिहिलेला पेपर दिला जातो. ही अक्षरे एवढी मोठी असतात, की पेजवर काही वाक्यच बसू शकतात. त्यांची दृष्टी कमकुवत होत चालली आहे.