Russia Ukraine War: पुतीन यांचे कुटुंबीयच त्यांच्या जीवावर उठलेत? पोटच्या मुली आणि पूर्व पत्नीपासून धोका, एक्स्पर्ट्सचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:43 PM2022-03-26T18:43:02+5:302022-03-26T18:43:32+5:30
Russia Ukraine War: युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर कलंकित झाल्याच्या बातम्या समोर आल्याच आहेत. त्यात आता पुतीन यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या विरोधात असल्याची माहिती समोर आली आहे.
Russia Ukraine War: युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर कलंकित झाल्याच्या बातम्या समोर आल्याच आहेत. त्यात आता पुतीन यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या विरोधात असल्याची माहिती समोर आली आहे. पुतीन आता अनेकांच्या निशाण्यावर आहेत. पुतीन यांच्या मुली त्यांची हत्या करू शकतात, असं दावा एका तज्ज्ञानं केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून क्रेमलिनचे उच्च अधिकारी पुतीन यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. असं मानले जात आहे की जर पुतीन यांच्या हातून सत्ता गेली तर त्यांच्या जागी माजी केजीबी एजंट अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनवले जाऊ शकते.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ डॉ. लिओनिड पेट्रोव्ह यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, जर कोणी व्लादिमीर पुतीन यांना मारलं तर ते त्यांच्या खूप जवळचेच असतील. "मला विश्वास आहे की जर कोणी पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न केला तर तो एका महिलेनेच केला असेल. त्यांच्या कुटुंबातील सदस्यच असं करू शकतो. त्यांना मारणारी व्यक्ती त्यांची मुलगी, पूर्व पत्नी किंवा त्यांच्या इतर जवळची व्यक्ती असू शकते", असं पेट्रोव्ह म्हणाले.
पुतीन यांची हत्या कोण करू शकतं?
डॉ. पेट्रोव्हच्या सिद्धांतानुसार, पुतीन यांना मारू शकणारे लोक कोण आहेत? याचा विचार केला असता काही नावं समोर येतात. पुतीन त्यांचं वैयक्तिक आयुष्य अगदी गुप्त ठेवतात. परंतु, लग्नाच्या ३० वर्षानंतर त्यांनी २०१३ मध्ये आपली पूर्व पत्नी ल्युडमिला पुतीना हिला घटस्फोट दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांना दोन मुली आहेत, ३६ वर्षांची मारिया फासेन आणि तिची बहीणकातेरिना तिखोनोवा(३५). पुतीन हे लुईझा रोजोवा नावाच्या १८ वर्षांच्या मुलीचेही वडील असल्याची अफवा आहे. मात्र, पुतीन यांनी या गोष्टी कधीच मान्य केल्या नाहीत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या करणाऱ्यांची खूप मोठी आहे. त्यांची हत्या करणं हे काही सहज शक्य नाही. असं करण्याचा विचारही कुणी केला तर पुतीन यांच्याशी जवळीक साधण्याआधी त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. पुतीन सुरक्षेबद्दल नेहमी सतर्क असतात. त्यांना प्रशिक्षित अंगरक्षकांचा २४ तास वेढा असतो. याशिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचार्यांचे तगडे वर्तुळही हजर असतं. अशा परिस्थितीत जर एखाद्याला पुतीनपर्यंत पोहोचायचे असेल तर त्याला खूप मेहनत करावी लागेल.