रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची कथित मुलगी लूइजा क्रिवोनोगिक (Luiza Krivonogikh) अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लुईजने तिच्या आईच्या ३.१ मिलियन डॉलरच्या पेंटहाऊसचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून तिचा काहीच पत्ता नाहीये. असं मानलं जात आहे की, पुतिन आपल्या कथित मुलीच्या वागण्यावर संतापले होते आणि तिच्या गायब होण्यामागे त्यांचा हात असू शकतो. लूइजा ब्लादिमीर पुतिन यांची गर्लफ्रेन्ड स्वेतलाना क्रिवोनोगिखची मुलगी आहे.
मुलीवर नाराज होते पुतिन
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, १८ वर्षीय लूइजाच्या आईचं नाव या वर्षाच्या सुरूवातील पॅंडोरा पेपर्स लीकमध्ये समोर आलं होतं. यात तिच्या अनेक संपत्तींचा उल्लेख करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यात लूइजाने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही. असं मानलं जातं आहे की, पुतिन लुईजावर आधीच नाराज होते आणि पेंटहाऊसचा फोटो शेअर केल्यावर ते अधिकच रागावले. अशात अशी शक्यता वर्तवली जात आहे की, पुतिन यांनी त्यांच्या मुलीला गायब केलं.
पेंटहाऊसमध्ये शिफ्ट झाली होती स्वेतलाना
पॅंडोरा पेपर्स लीक ज्यात १.९ मिलियनपेक्षा अधिक संवेदनशील कागदपत्रे होती. ज्यात सांगण्यात आलं होतं की, स्वेतलाना लुईजाच्या जन्मानंतर लगेच मोटे कार्लो पेंटहाऊसमध्ये शिफ्ट झाली होती. ज्यानंतर असं म्हटलं जात होतं की, लुइजा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचीच मुलगी आहे. दुसरीकडे पुतिन यांनी ही बाब खोटी असल्याचं म्हटलं होतं. आणि मीडियाला त्यांच्या खाजगी आयुष्यात न डोकावण्याचा सल्ला दिला होता. लुइजा luziaroz नावने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट चालवते.
नातं जुळताच बदललं नशीब
पुतिन यांच्या कथित मुलीने शेवटची पोस्ट १ ऑक्टोबरला केली होती. यानंतर तिचा काहीच पत्ता नाहीये. 'गार्डियन'च्या रिपोर्टमध्ये काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते की पुतिनसोबत मैत्री केल्यानंतर स्वेतलाना क्रिवोनोगिखची संपत्ती कमालीची वाढली होती. तिने सेंट पीटर्सबर्गमध्ये महागड्या भागात फ्लॅट, मॉस्कोमध्ये संपत्ती आणि एक क्रूज खरेदी केलं होतं. याची व्हॅल्यू साधारण १०० मिलियन डॉलर होती. असं सांगितलं जातं की, स्वेतलाना पुतिन यांच्या घरी सफाईचं काम करत होती आणि पुतिनसोबतच्या नात्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं.