शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 2:09 PM

Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva : अलीनाला देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, काही कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात पुतिन यांच्या गर्लफ्रेन्ड देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.

(Image Credit : The Sun)

Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva : रशिया आणि यूक्रेनच्या (Russia-Ukraine War) युद्धात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची सीक्रेट गर्लफ्रेन्ड अलीना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) 'अडकली' आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतिन यांची गर्लफ्रेन्ड स्वित्झर्लॅंडमध्ये एका सुरक्षित ठिकाणी आहे. अशात अलीनाला देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, काही कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात पुतिन यांच्या गर्लफ्रेन्ड देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.

अलीना ही पुतिन यांच्या तीन मुलांची आई असल्याचं म्हटलं जातं. एक खेळाडू म्हणून अलीनाने अनेक खिताब आणि मेडल मिळवले. पुतिन यांच्यासोबत नाव जोडलं गेल्यानंतर तिचं जीवन पूर्णपणे बदललं. आता ती रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' आहे. स्वित्झर्लॅंडमधील लोकांची इच्छा आहे की, तिला इथे ठेवू नये. कारण तिचं नातं यूक्रेनला युद्धात ढकलणाऱ्या पुतिनसोबत आहे. 

अलीना शेवटची २०१८ मध्ये दिसली होती. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. ब्लादिमीर पुतिन यांचं पर्सनल आयुष्य अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. अशात अलीनाबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण असं मानलं जात आहे की, रशियावर चहूबाजूने लागत असलेल्या प्रतिबंधांमुलळे पुतिन यांनी आपल्या परिवाराला स्वित्झर्लॅंडला पाठवलं आहे. अलीना एक यशस्वी जिम्नास्ट होती. तिने ऑलम्पिकमध्ये दोनदा गोल्ड मेडल, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २५ यूरोपिय चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. स्पोर्ट्समधून रिटायर झाल्यानंतर ती राजकारणात गेली आणि पुतिन यांच्या पक्षाची खासदारही झाली होती.

अलीना आणि पुतिन यांचं नाव पहिल्यांदा २००८ मध्ये जोडलं गेलं होतं. पुतिन यांच्याआधी २००४ मध्ये डेविड मुसेलिआनीसोबत अलीनाच्या अफेअरची चर्चा रंगली होती. रशियन वृत्तपत्र Moskovsky Korrespondent ने पहिल्यांदा दावा केला होता की, पुतिन आणि अलीना यांच्या प्रेम प्रकरण सुरू आहे. पण त्यानंतर या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. नंतर हा पेपर बंद पडला. २०१९ मध्ये समोर आलं की, अलीनाने मॉस्कोच्या एका हॉस्पिटलमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला. यावेळी हॉस्पिटलचा व्हिआयपी फ्लोर रिकामा करण्यात आला होता. पण नंतर या बातमीचंही खंडन करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया