Vladimir Putin attack on Ukraine: हे औषध पुतीन यांना आक्रमक करतेय; बड्या डॉक्टरचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:43 IST2022-02-28T15:42:22+5:302022-02-28T15:43:59+5:30
Vladimir Putin Aggressive on Russia-Ukraine War: पुतीन यांचा चेहरा पहा, तो खूप बदलला आहे. आता त्यांचा चेहरा अंडाकृती दिसू लागला आहे.

Vladimir Putin attack on Ukraine: हे औषध पुतीन यांना आक्रमक करतेय; बड्या डॉक्टरचा खळबळजनक दावा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष एवढे बलाढ्य देश, संघटना समोरून हुलकावणी देत असतानाही युक्रेनवर हल्ला करण्यास मागे धजावले नाहीत. अमेरिकेसारख्या देशाला निर्बंध लादले तरी तोडीस तोड उत्तरे देत आहेत. पुतीन यांचा स्टॅमिना किंवा त्यांची शरीरयष्टी आणि त्यांचा तजेलदार चेहरा पाहता ब्रिटनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी ते स्टेरॉईड घेत असतील असा दावा केला आहे.
व्यवसायाने डॉक्टर असलेले लॉर्ड ओवेन यांनी दावा केला आहे. टाइम्स रेडियोला त्यांनी ही माहिती दिली आहे. पुतीन यांचा चेहरा पहा, तो खूप बदलला आहे. आता त्यांचा चेहरा अंडाकृती दिसू लागला आहे. काही लोकांच्या अंदाजानुसार त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. किंवा त्यांनी बोटॉक्स हे इंजेक्शन घेतले असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, मला तसे वाटत नाही असे ओवेन यांनी म्हटले आहे.
लॉर्ड ओवेन म्हणाले की पुतिन एकतर बॉडीबिल्डरप्रमाणे अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घेत असावेत. किंवा ते कॉर्टिकोस्टिरॉईड्स वापरत असतील. स्टेरॉईड्सच्या वापरामुळेच चेहऱ्यावर असे बदल होतात. हे औषध घेणारा व्यक्ती आक्रमक होतो. तथापि, यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. ज्यामुळे तुम्ही सहज कोरोनाला बळी पडू शकता.
पुतीन यांनी स्वतःला पूर्णपणे आयसोलेट केले होते. ते कोणाला भेटत नव्हते. पुतिन हे स्टेरॉईड्स घेत असावेत हे स्पष्ट आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पुतीन 69 वर्षांचे आहेत. तरीही ते कमालीचे फिट दिसत आहेत. त्यांनी हिवाळ्यात गोठलेल्या सरोवरात आंघोळ करण्यापासून ते लष्करी सरावांमध्ये सक्रियपणे भाग घेण्यापर्यंतच्या कथा सुरूच राहतात. खेळातही खूप रस आहे. पुतीन यांना ज्युडो, बॉक्सिंग, फुटबॉल, घोडेस्वारी, डायव्हिंग, हॉकी आणि बॅडमिंटन यांसारख्या खेळांची खूप आवड आहे. पुतिन हे ज्युडोमध्येही ब्लॅकबेल्ट आहेत.