मॉस्को - रशियातील वॅगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या सत्तेला आव्हान दिले खरे; पण दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर हद्दपार होण्यासाठी अचानक करार केल्यावर शनिवारी रात्रीच हे बंड थंड झाले. तथापि, पुतीन यांच्या सामर्थ्यावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर या संक्षिप्त बंडाने रशियन सैन्यांमधील कमकुवतपणा उघड झाला.
बंडात भाग घेतलेल्या वॅगनर सैनिकांवर खटला चालविला जाणार नाही. जे सैनिक या बंडात सहभागी झाले नाहीत, त्यांना संरक्षण मंत्रालयाने कराराची ऑफर दिली. बेलारुसला जातील. विश्लेषकांना असे वाटते की, पुतिन यांच्यासाठी हा धोका आहे की त्यांच्याकडे कमकुवत म्हणून पाहिले जाईल. प्रिगोझिन यांच्याबाबत अमेरिकेलाही गुप्त माहिती मिळाली होती.
....आणि मोठा संघर्ष टळला- येवगेती प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील वॅगनर गटाचे सैनिक रशियन शहरात रोस्तोव्ह ऑन-दोनपर्यंत पोहोचले, तसेच मॉस्कोच्या दिशेने शेकडो किलोमीटर पुढे जाऊ शकले.- याचवेळी रशियन सैन्याने रशियाच्या राजधानीचे रक्षण करण्यासाठी जोरदार मुसंडी मारली. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडीत वॅगनरच्या प्रमुखांनी आपल्या सैनिकांना अचानक मार्ग बदलण्यास सांगितले.- त्यांनी आपल्या सैनिकांना मॉस्कोच्या दिशेने न जाण्याचे आणि रशियन नागरिकांचा रक्तपात टाळण्यासाठी युक्रेनमधील त्यांच्या तळांवर परत जाण्याचे आदेश दिले.येवगेनी प्रिगोझिन जाणार बेलारुसलाक्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शनिवारी जाहीर केलेल्या करारानुसार, येवगेनी प्रिगोझिन हे शेजारच्या त्यांच्यावरील सशस्त्र बंडखोरीचे आरोप वगळले जातील. तथापि, रविवारी सकाळपर्यंत प्रिगोझिन बेलारूसमध्ये आल्याचे कोणतेही वृत्त नव्हते.