Vladimir Putin Threat To Boris Johnson: बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:28 IST2023-01-30T13:27:30+5:302023-01-30T13:28:20+5:30
सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती.

Vladimir Putin Threat To Boris Johnson: बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 11 महिन्यांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. यातच ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी, ब्रिटनवर मिसाइल हल्ला करण्याची धमकी दिली होती, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या सैनिकांना युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्याचा आदेश दिला होता.
पुतिन यांनी ब्रिटनला दिली होती धमकी -
सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे, की पुतिन यांनी मला धमकी दिली होती आणि म्हटले होते की, ''बोरिस, आपल्याला दुखवण्याची मुळीच इच्छा नाही, पण क्षेपणास्त्र डागायला केवळ 1 मिनिट लागेल.'
बोरिस जॉन्सन यानी केले होते युक्रेनचे समर्थन -
ब्रिटन अथवा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पश्चिमेकडील इतर नेत्यांनी युक्रेनला समर्थन दिले होते आणइ रशियन हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बोरिस जॉन्सन झेलेन्स्की यांच्यासाठी पश्चिमेकडील सर्वात भाऊक समर्थक म्हणून समोर आले होते. ब्रिटेनवरील मिसाइल हल्ल्याच्या धमकीसदर्भात बोरिस जॉन्सन यांनी असेही म्हटले आहे की, पुतिन अत्यंत शांतपणे बोलत असल्याचे वाटत होते. पुतिन यांच्या बोलण्यावरून वाटत होते, की माला समजण्याचा प्रयत्न करत होते.
बीबीसीच्या नव्या डॉक्यूमेंट्रीत युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्यापूर्वी रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन आणि पश्चिमेकडील देशांतील वाढते मतभेत दर्शवण्यात आले आहेत.