पुतीन २०२४ वाढदिवस साजरा करणार नाहीत, माजी खासदाराचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:59 PM2023-01-13T14:59:14+5:302023-01-13T15:00:20+5:30
पोनोमेरेव यांनी २००७ ते २०१६ या कालावधीत रशियातील संसंदेत म्हणजे ड्युमा येथे सदस्यपदी प्रतिनिधित्व केलं आहे
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे २१ व्या शतकापासूनच येथील सत्तेत आहेत. मात्र, आता २०२४ चा वाढदिवस ते साजरा करु शकणार नाहीत, असे भाकितच करण्यात आले आहे. एक निर्वासित रुसी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुतीन यांचा एक पाय स्मशानात आहे. पुतीन हे भलेही २१ व्या शतकापासून कुठल्या ना कुठल्या मार्गाने सत्तेत आहेत. पण, २०२४ चा आपला वाढदिवस ते साजरा करू शकणार नाहीत, असे रुसचे माजी विरोधी पक्षनेते इल्या पोनोमेरेव यांनी म्हटले. विशेष म्हणजे पुतीन यांच्या निकटवर्तीयांनाच यासाठी जबाबदारही धरले आहे.
पोनोमेरेव यांनी २००७ ते २०१६ या कालावधीत रशियातील संसंदेत म्हणजे ड्युमा येथे सदस्यपदी प्रतिनिधित्व केलं आहे. आता, ते युक्रेनचे नागरिक आहेत. 70 वर्षीय पुतीन हे युक्रेनसोबतच्या युद्धात विजय मिळवू शकत नाहीत, असा दावाही पोनोमेरेव यांनी केला आहे. त्यामुळेच, पुतीन यांचे निकटवर्तीयही आता त्यांच्याविरुद्ध होऊ शकतात. पुतीन यांची प्रतिमा अजय व्यक्तीत्व असल्याची आहे, पण २०२२ मध्ये त्यांच्या या प्रतिमेला तडा गेला. माझा अनुभव हेच सांगतो की, ते २०२४ मधील त्यांचा जन्मदिवस साजरा करु शकणार नाहीत, असे भाकितच पोनोमेरेव यांनी केले.
पुतीन यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपण पाहावे, हे माझे स्वप्न आहे. मात्र, या स्थितीपर्यंत ते पोहोचतील असे वाटत नाही. त्यांचे निकटवर्तीय लोकच त्यांना द हेग पर्यंत पोहोचू देणार नाहीत. कारण, पुतीन यांचा जबाब त्या लोकांसाठीही घातक ठरू शकतो. त्यामुळेच, पुतिन ठार मारले जातील, असे त्यांनी म्हटले.
रुसमधील तथाकथित लिबरल लोकांकडून पुतिन यांना सत्तेतून खाली खेचण्याचं कामही केलं जाऊ शकतं. मात्र, पुतिन यांना सत्तेतून हटविणे अधिक धोकादायक आहे, असेही पोनोमेरेव यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुतिन हे गंभीर आजाराने त्रस्त असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळेस माजी खासदाराने हे विधान केलं आहे.