शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Vladimir Putin's Health: पुतीन यांच्याकडे तीन वर्षेच शिल्लक? रशियन मंत्री म्हणाले, तुम्हीच टीव्हीवर पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 8:59 AM

Russia-Ukraine War: रशियन गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने पुतीन यांच्या प्रकृतीची माहिती गुप्तपणे युरोपमध्ये राहणारे माजी रशियन गुप्तहेर बोरिस किरपिचनिकोव्ह यांना पाठविली होती. तो संदेश युरोपच्या गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. यात पुतीन यांचे हात पाय थरथर कापत असल्याचेही म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर झाल्याचेही सांगितले जात आहे. लवकरच त्यांच्यावर ऑपरेशन होणार अशाही चर्चा असताना आता रशियाच्याच गुप्तचर अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. 

रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याने पुतीन यांना कॅन्सरचा विळखा पडला असून त्यांची नजर वेगाने कमजोर होऊ लागल्याचा दावा केला आहे. इंडिपेंडंट वृत्तपत्राला त्यानेही माहिती दिली आहे. पुतीन हे आणखी तीन वर्षेच जिवंत राहू शकतात, असेही त्याने म्हटले आहे. 

69 वर्षीय पुतिन यांना कर्करोग असल्याचे निदान झाले आहे, यामुळे त्यांची तब्येत ढासळत आहे, अशा चर्चा जगभरात सुरु असताना हा दावा करण्यात आला आहे. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी रविवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन आजारी असल्याच्या सर्व बातम्या फेटाळून लावत त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचे सांगितले.पुतीन यांना डोकेदुखीचा त्रास होतोय, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. जेव्हा ते टीव्हीवर जनतेला संबोधित करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना मोठ मोठ्या अक्षरात लिहिलेल्या कागदांची गरज भासते. छोटी अक्षरे त्यांना वाचता येत नाहीत. ही अक्षरे एवढी मोठी असतात की एका पानावर एक किंवा दोन वाक्येच मावतात. पुतीन यांची दृष्टी गंभीरपणे कमजोर होत चालली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

रशियन गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने पुतीन यांच्या प्रकृतीची माहिती गुप्तपणे युरोपमध्ये राहणारे माजी रशियन गुप्तहेर बोरिस किरपिचनिकोव्ह यांना पाठविली होती. तो संदेश युरोपच्या गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. यात पुतीन यांचे हात पाय थरथर कापत असल्याचेही म्हटले आहे. 

यावर रशियाचे मंत्री लावरोव यांनी म्हटले की, "मला वाटत नाही की समजूतदार लोकांना पुतीन यांच्यात काही आजार किंवा आजाराची चिन्हे दिसू शकतात. पुतीन आता ऑक्टोबरमध्ये ७० वर्षांचे होतील, परंतू ते दररोज लोकांसमोर येतात. तुम्ही त्यांना ठळकपणे टीव्हीवर चालताना पाहू शकता, बोलताना पाहू शकता, त्यांचा आवाज ऐकू शकता, असे ते म्हणाले. 

 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया