शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

ब्राझीलमध्ये 3 दिवसांसाठी व्हॉट्सअॅपवर बंदी

By admin | Published: May 03, 2016 1:31 PM

अमली पदार्थांच्या तस्करीचा तपास करण्यासाठी हवी असलेली माहिती पुरवण्याच्या बाबतीत व्हॉट्सअॅपने अलिप्ततेची भुमिका घेत नकार दिल्याने ही बंदी आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
ब्रासिलिया , दि. 03 - ब्राझीलमध्ये 72 तासांसाठी व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्यात आली आहे. न्यायाधीशांनी सर्व मोबाईल सेवा पुरवणा-या टेलिकॉम कंपन्यांना तसे आदेशच दिले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीचा तपास करण्यासाठी हवी असलेली माहिती पुरवण्याच्या बाबतीत व्हॉट्सअॅपने अलिप्ततेची भुमिका घेत नकार दिल्याने ही बंदी आली आहे.
 
फेसबुकने 2014 मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं आहे. दोन व्यक्तींच्या दरम्यान झालेली संवाद - संदेशाची देवाण घेवाण सर्वस्वी गुप्त ठेवण्याच्या फेसबुकच्या पॉलिसीमुळे गुंता निर्माण होत आहे. कारण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हाही आम्हाला व्हॉट्सअॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबुकची भुमिका आहे. याने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मोठा विस्तार झाला पण सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हिताचा संकोच झाला आहे. याच भुमिकेतून न्यायालयाने बंदीचा आदेश दिला आहे. 
 
अशाच प्रकारचा एक जुना संदर्भ अॅपलच्या बाबतीतही उपलब्ध आहे. दहशतवाद्यांनी परस्परांशी केलेले संवाद उघड करण्यास अॅपलने नकार दिला होता. आम्ही अशा पद्धतीनं ग्राहकाच्या संभाषणात डोकावणार नाही याची हमी दिल्याचे कारण अॅपलने पुढे केले होते.