जकार्ता- इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. या सुनामीममध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या सुनामीनं डझनांहून अधिक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. ही सुनामी स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी दिली आहे.या सुनामीमध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक लोक जखमी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केलं. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही नुग्रोहो यांनी व्यक्त केली आहे. अनक क्रॅकटो हे छोटं ज्वालामुखीचं बेट आहे. 1883मध्ये क्रॅकटो ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे बेट अस्तित्वात आलं.
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं सुनामीचा कहर, 168 लोकांचा मृत्यू, 600 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 7:53 AM
इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे.
ठळक मुद्दे इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. सुनामीममध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना दिली