न्यूयॉर्क : जर्मनीची जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन अमेरिकेतून जवळपास ६ लाख कार्स परत मागवून घेणार आहे. या वाहनांत आग लागेल किंवा त्यातील एअरबॅग उपयोगातच येणार नाही असा दोष निर्माण झाल्यामुळे ही वाहने माघारी बोलावली जाणार असून त्यात बहुतांश कार्स या अत्यंत लोकप्रिय आॅडी मॉडेलच्या आहेत. अजूनपर्यंत अमेरिकेत या दोषामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे नॅशनल हायवे ट्राफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने शनिवारी आपल्या संकेतस्थळावर म्हटले. मागच्या वर्षी चीन आणि इस्रायलमध्ये काही अपघात घडल्यानंतर अमेरिकेतून या कार्स माघारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्सचे डिलर्स आवश्यक ती दुरुस्ती आणि सुटे भाग कोणतेही शुल्क न आकारता करून व बदलून देणार आहेत, असे फोक्सवॅगनने म्हटले.
फोक्सवॅगन सहा लाख कार्स माघारी घेणार
By admin | Published: January 30, 2017 12:47 AM