Ukraine President Volodymyr Zelensky: मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच युक्रेनने मंगळवारी (7 मे) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. युक्रेनने दोन युक्रेनियन सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक केली असून, ते रशियाच्या मदतीने झेलेन्स्की यांची हत्या करण्याची योजना आखत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटीजने सांगितले की, झेलेन्स्की यांच्या हत्येची योजना आखल्याप्रकरणी दोन कर्नलांना अटक करण्यात आली आहे. रशियाला माहिती लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
काय होती योजना ?युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसने म्हटले की, राष्ट्रपती झेलेन्स्कींचे अपहरण आणि नंतर त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. त्यांच्याशिवाय, इतर अनेक वरिष्ठ युक्रेनियन अधिकाऱ्यांनाही टार्गेट करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये सुरक्षा सेवा प्रमुख वासिल मल्युक आणि युक्रेनचा संरक्षण गुप्तचर प्रमुख किरिल बुडानोव्ह यांचा समावेश आहे.
यापूर्वीही हत्येचा कट रचण्यात आला याआधी ऑगस्ट 2023 मध्ये झेलेन्स्कींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मायकोलायव्हच्या दक्षिण युक्रेनियन प्रदेशातून एका महिलेला अटक करण्यात आली होती. या महिलेवर झेलेन्स्कींच्या मायकोलायव्हच्या भेटीबद्दल गुप्तचर माहिती गोळा केल्याचा आरोप आहे.