"आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कारण...", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं EU संसदेत भावनिक भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:17 AM2022-03-02T09:17:59+5:302022-03-02T09:19:04+5:30

Volodymyr Zelensky Speech in EU: झेलेन्स्की हे कीव्हमधून युक्रेनियन भाषेत बोलत होते आणि त्यांचे भाषण थेट भाषांतरित केले जात होते. मुलांना वाचवण्याबाबत बोलताना अनुवादकाचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू तरळले. यामुळे काही काळ भाषण थांबले होते.

volodymyr zelensky speech in eu our cities are blocked but nobody will break us zelensky tells eu parliament | "आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कारण...", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं EU संसदेत भावनिक भाषण

"आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कारण...", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं EU संसदेत भावनिक भाषण

Next

Volodymyr Zelensky Speech in EU:  एकीकडे रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Vladimir Putin) युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव्ह काबीज करण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडण्यास तयार आहेत तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) हे लालसेनेला चोख इराद्याने आव्हान देत आहेत. मंगळवारी झेलेन्स्की यांनी युरोपियन संघाच्या (EU Parliament) संसदेत भावनिक भाषण केले. यादरम्यान कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला वाचवण्याची झेलेन्स्की यांची तळमळ पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.

आपल्या भावूक भाषणात व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, "माझ्या देशात जे घडत आहे ते एक लादलेली शोकांतिका आहे. आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कारण आम्ही युक्रेनियन आहोत." दरम्यान, झेलेन्स्की हे कीव्हमधून युक्रेनियन भाषेत बोलत होते आणि त्यांचे भाषण थेट भाषांतरित केले जात होते. मुलांना वाचवण्याबाबत बोलताना अनुवादकाचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू तरळले. यामुळे काही काळ भाषण थांबले होते. असे एकदा नव्हे तर तीनदा घडले.

याचबरोबर, "आज युरोपीय संघाला हे सिद्ध करावे लागेल की ते सत्याच्या पाठीशी आहेत, ते आमच्यासोबत आहेत", असे व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले. तसेच, झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात पुतीन यांना युद्ध गुन्हेगार म्हटले आहे. याशिवाय, झेलेन्स्की यांनी भाषणाच्या शेवटी मुठ दाबून युक्रेन वाचवण्याच्या त्यांच्या अटल संकल्पाचा संदेश दिला. यानंतर युरोपियन संघाच्या सर्व सदस्यांनी जवळपास पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवल्या.

युक्रेनने सोमवारीच युरोपियन संघाचा सदस्य होण्यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात झेलेन्स्कीच्या उत्कट आवाहनानंतर युक्रेनच्या युरोपियन संघामधील प्रवेशाला औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला करुन अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेनचा जास्त दिवस टिकाव लागणे अवघड आहे.

Web Title: volodymyr zelensky speech in eu our cities are blocked but nobody will break us zelensky tells eu parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.