शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 1:48 PM

afghanistan crisis : अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला.

२० वर्षांनंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले. सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे. अमेरिकी सैन्य पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानला स्वतंत्र झालेला देश घोषित केले. तसेच, तालिबानने अमेरिका आणि इतर देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Want good relations with the US and world, say Taliban as America pulls out of Afghanistan after 20 years)

अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला. तसेच, तालिबानने काबूल विमानतळ ताब्यात घेतले आणि अफगाणी नागरिकांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, "अफगाणिस्तानचे अभिनंदन … हा विजय आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्ही त्या सर्वांशी चांगल्या राजनैतिक संबंधांचे स्वागत करतो."

(अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबान्यांकडून हवेत गोळीबार करत आनंद साजरा)

अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केला आहे. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, असे तालिबानने म्हटले आहे. 

बायडेन यांनी आपल्या सैन्याचे आभारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भाष्य केले. जो बायडेन यांनी आपले सैन्य खतरनाक मोहिमेवरून परतण्यावर आभार मानले आहेत. ते म्हणाले की, गेल्या १७ दिवसांत आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट केले. आम्ही १.२ लाखांहून अधिक अमेरिकी नागरिक, सहकारी देशांचे नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढले.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका