कराची - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा विरोधी पक्षनेता इम्रान खानची दुसरी पत्नी पत्रकार रेहम खानला वासिम अक्रमसह चार जणांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. रेहम खानने टेल ऑल या आत्मचरित्रामध्ये आपल्या सेक्स लाईफविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. 'टेल ऑल' हे पुस्तक गेल्या काही दिवसापूर्वी ऑनलाईन लीक झाले होते. त्यामध्ये अनेक नामवंत व्यक्तीबद्दलची संवेदनशिल लिखाण करण्यात आले आहे. वासिम अक्रमशिवाय इम्रान खान, पहिला पती डॉ. इजाज रेहमान आणि ब्रिटीश उद्योगपती सय्यद जुल्फिकार बुखारी यांनीही रेहम खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 'टेल ऑल' या पुस्ताकातील माहिती खोटी, अपमानकारक आणि निराधार असून याद्वारे आमची प्रतिमा मलिन केली जात आहे, असे नोटीशीत म्हटले आहे.
2015 मध्ये इम्रान खानसोबतने पत्रकार रेहम खान विवाहबद्ध झाल्या होत्या मात्र, 10 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, रेहम खानने आपल्या टेल ऑल या पुस्तकामध्ये सेक्स लाईफ, इम्रान खानसोबतचे वैवाहिक आयुष्य, पाकिस्तानमधील क्रिकेटपटू, नेते, उद्योगपती यांच्याबाबत खळबळजनक दावे करण्यात आले आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, वसिम अक्रमने स्वत:च्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिल्या पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले होते. तर ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे उद्योजक सय्यद झुल्फीकार बुखारी यांनी इम्रान खानमुळे गर्भवती झालेल्या एका तरुणीचा गर्भपात करण्यास मदत केल्याचा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.