विमानांचे अपघात (DHL Plane Accident) कुठेना कुठे होत असतात. कुठे आग लागते तर कुठे विमान क्रॅश होतं. पण एखाद्या विमानाचे दोन तुकडे होणं असं फार कधी बघायला मिळत नाही. असाच अपघात सेंट्रल अमेरिकेच्या कोस्टा रीकामध्ये (Costa Rica plane split in two parts) बघायला मिळाला. एका विमानाने इमरजन्सी लॅंडिंग केलं आणि ट्रॅकवर उतरल्यावर काही वेळातच त्याचे दोन तुकडे झाले.
कोस्टा रीकाच्या जुआन सॅनटामारिया इंटरनॅशनल एअरपोर्टवर (Juan Santamaria International Airport) हा अपघात झाला. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, डीएचएल कंपनीचं Boeing 757-200 कार्गो विमानाने एअरपोर्टवर इमरजन्सी लॅंडिंग केलं आणि हा गंभीर अपघात झाला.
रिपोर्टनुसार, पायलट आणि को-पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सीबीएस न्यूजने अपघाताचा एका व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात विमान ट्रॅकवर उतरताना दिसत आहे. ते काही अंतर पुढे जात असताना विमानाचं बॅलन्स बिघताना दिसलं. विमान टर्न होतं आणि त्याचे दोन तुकडे होतात. डीएचएलकडून सांगण्यात आलं आहे की, क्रू मेंबर्सना कशाप्रकारचंही नुकसान झालं नाही. एका क्रू मेंबर्सना मेडिकल चेकअपसाठी पाठवण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार गौटमाला येथे जात असलेल्या या विमानाच्या हायड्रॉलिक्स सिस्टीममध्ये काहीतरी गडबड झाली होती. ज्यानंतर पायलटने इमरजन्सी लॅंडिंगची विनंती केली. कोस्टा रीका सिव्हिल एव्हिएशन विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल लुई मिरॅंडा म्हणाले की, विमान अजूनही ट्रॅकवरच आहे आणि डीएचएल, एअरपोर्ट अथॉरिटीसोबत मिळून विमान बाजूला करण्याचा काम सुरू आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.