शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Suez Canal : सुएझ कालव्यात अडकलेलं जहाज मार्गस्थ करण्यास यश; जागतिक व्यापाराला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:23 AM

Suez Canal Evergreen Ship : पाच दिवसांपासून अडकलेलं जहाज काढण्याचे सुरू होते प्रयत्न, पाहा जहाजाचा व्हिडीओ

ठळक मुद्देपाच दिवसांपासून अडकलेलं जहाज काढण्याचे सुरू होते प्रयत्नयापूर्वी शुक्रवारी फसले होते प्रयत्न

 युरोपशी सागरी मार्गाने जोडणारा आणि अत्यंत जलद मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या सुएझ कालव्यात मालवाहू जहाज अडकल्यानं या सागरी मार्गावरील जहाज वाहतूक पाच दिवसांपासून ठप्प झाली होती. यामुळे या मार्गाने देशात येणारी सुमारे ३५० मालवाहू जहाजे अडकून पडली होती. परंतु या सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश मिळालं आहे. रॉयटर्सनं केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.  दरम्यान, यानंतर जागतिक मालवाहतुकीसाठी हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सुएझ या अरुंद कालव्यातून दररोज ५० मालवाहू जहाजे मार्गस्थ होतात. २३ मार्चच्या सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी एव्हरग्रीन कंपनीचे ४०० मीटर लांबीचे अवजड जहाज या सुएझ कालव्यात अडकून पडलं होतं. त्यातच उठलेल्या वादळात हे जहाज तिरकंही झालं होतं. त्यातच दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गाळही साचलेला होता. यामुळे अडकून पडलेल्या मालवाहू जहाजाला गाळातून बाहेर काढण्यासाठी पाच दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अडथळे दूर होऊन सुएझ कालवा मालवाहतुकीसाठी पूर्ववत सुरू होईल. त्यासाठी केंद्र सरकारही याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली होती. दरम्यान, आता रविवारी सायंकाळी पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हे जहाज मार्गस्थ करण्यात आलं.  शुक्रवारी हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न फसले होते, असी माहिती बर्नहार्ड शुल्ट जहाज कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी दिली होती.  हे जहाज हलवण्यासाठी आतील बाजूला पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेच्या मदतीनं रविवारी हे दूर करण्याचा प्रयत्न झाला असून यात टग बोट्सचा वापरही करण्यात आला. या प्रयत्तांना अखेर यश मिळालं आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJNPTजेएनपीटी