न्यूझीलंड२०२१ या वर्षाचं स्वागत करणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. कोरोनावर मात केलेल्या न्यूझीलंडमध्ये आज मोठ्या धुमधडाक्यात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटं आधी न्यूझीलंडने नव्यावर्षात प्रवेश केला आहे. जोरदार आतषबाजी करत न्यूझीलंडने नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. न्यूझीलंडमधील आतषबाजीचे व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल झाले आहेत.
नवंवर्ष स्वागताला होणारी आकर्षक आतषबाजी पाहणं हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आकर्षणाचं ठिकाण असतं. कोरोनामुळे यंदा जगातील अनेक देशांवर सण आणि उत्सवावर निर्बंध आले. न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहराने यंदाच्या वर्षात दहशतवादी हल्ल्यालाही तोंड दिलं. जात्या वर्षासह यंदाच्या वर्षातील सर्व आव्हानांना गुडबाय करत न्यूझीलंडने नववर्षाचं स्वागत केलं.
दुसरीकडे, न्यूझीलंडपेक्षा केवळ २ तासांनी मागे असलेल्या ऑस्ट्रेलियातही नवंवर्षाचं स्वागत झालं आहे. सिडनमध्ये तुफान आतषबाजीने २०२१ वर्षाचं स्वागत करण्यात आलं.