बँकॉक-
थायलंडमध्ये काही दिवसांपूर्वी पावसात एका नाल्यात फसलेल्या हत्तीणी आणि तिच्या पिल्लाला यशस्वीरित्या वाचविण्यात आलं. हत्तीणीला पशु चिकित्सकांनी बाहेर काढलं तेव्हा ती बेशुद्ध असल्याचं दिसून आलं. डॉक्टरांनी तातडीनं सीपीआर देऊन हत्तीणीचे प्राण वाचवले. १५ जुलै रोजी थायलंडच्या नखोन नायोक प्रांतात मुसळधार पावसामुळे रानात मोठ्या प्रमाणात चिखल आणि दलदल झाली होती. दलदलीमुळे एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका सात फूट खोल खड्ड्यात पडलं.
टेलिग्राफच्या वृत्तानुसार मुसळधार पावसात पशु चिकित्सकांकडून दोन्ही हत्तींना वाचवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आलं. मादी हत्तीनं आपल्या पिल्लाला आपल्या शरीराखाली झाकून ठेवलं होतं आणि त्याचं रक्षण ती करत होती. वाइल्डलाइफ वॉलंटियर्सनं १० वर्षांच्या हत्तीणीला शांत केलं, पण काँक्रीटच्या किनाऱ्यावर डोकं आपटल्यामुळे ती बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी क्रेनच्या मदतीनं हत्तीणीला बाहेर काढलं आणि तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात डॉक्टरांना यशही आलं.
तीन तासांहून अधिकवेळ चाललं रेस्क्यू ऑपरेशनरेस्क्यू ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की तीन डॉक्टर हत्तीणीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हत्तीणीवर उभं राहून आपल्या वजनानं दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हत्तीणीला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर तिच्या पिल्लाला देखील काही वेळानं बाहेर काढण्यात आलं. या संपूर्ण कामाला जवळपास तीन तासांहून अधिक वेळ लागला. खाओयाई नॅशनल पार्क डिपार्टमेंटच्या पशु चिकित्सक डॉ. चानन्या कंचनसारक यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीण जवळ असताना तिच्या पिल्लाच्या जवळ जाणं शक्य होत नव्हतं. यासाठी हत्तीणीला ट्रँक्विलायजरचे तीन डोस दिले.
मदतीसाठी आले असता ३० हत्तींचा कळप"खड्ड्यातून बाहेर येण्याआधी हत्तीण आपल्या पिल्लापाशी जाऊ लागली आणि यातच तिच्या डोक्यावर जखम झाली. यात ती जागीच बेशुद्ध झाली. आमची टीम आणि पिल्लाच्या अथक प्रयत्नांच्या अंती हत्तीणीला जाग आली", असं डॉक्टरांनी सांगितलं. मादी हत्तीणीच्या मदतीसाठी ३० हून अधिक हत्ती देखील आले असते आणि याचीच पार्क रेंजर्सना भीती होती. पशु चिकित्सकांच्या अथक प्रयत्नांच्याअंती हत्तीणीला शुद्ध आली आणि ती आपल्या पिल्लासह पुन्हा जंगलाच्या दिशेनं गेली.