शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मंगळावर पाणी!

By admin | Published: September 29, 2015 2:42 AM

मंगळावर खाऱ्या पाण्याच्या घळींच्या रेघोट्या आढळल्याने जगभरातील शास्त्रज्ञांना खुणावणाऱ्या मंगळ ग्रहावर पाणी असल्याच्या आशा बळावल्या आहेत.

पॅरिस: मंगळावर खाऱ्या पाण्याच्या घळींच्या रेघोट्या आढळल्याने जगभरातील शास्त्रज्ञांना खुणावणाऱ्या मंगळ ग्रहावर पाणी असल्याच्या आशा बळावल्या आहेत. नासाच्या एमआरओ यानावरील इमेजिंग स्पेक्टोमीटरचा वापर करून संशोधकांनी मंगळावरील टेकड्यांच्या उतारावर द्रवरुपी खनिजे शोधली.मंगळाभोवती फिरणाऱ्या नासाच्या यानामार्फत मिळालेल्या डाटानुसार टेकड्यांवर आढळलेली ही लक्षणे मिठाशी संबंधित आहेत. पाणी गोठविण्यासह त्याचे बाष्पात रुपांतर करण्यासाठी लागणारे तापमानही हे मीठ बदलू शकते. त्यामुळे पाणी अधिक काळ प्रवाहित होऊ शकते.या घळी शंभर मीटर लांबीच्या व पाच मीटर रूंद आहेत. मंगळाच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या पाण्यामुळे या घळी तयार झाल्या असाव्यात, असे मत खगोलशास्त्रज्ञांनी या आधीची व्यक्त केले होते. एप्रिलमध्येही शास्त्रांनी जर्नल नेचर जिओसायन्स या नियतकालिकात मिठाचा पाझर आढल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे लुजेंद्र ओझा यांनीही या छायाचित्रावरून मंगळावर पाणी असल्याची सैद्धांतिक शक्यता व्यक्त केली आहे. आोझा हे अटलांटातील जॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलीजीतून पीएचडीधारक असून ते या संशोधन लेखाचे सह-लेखक आहे. अल्फ्रेड मॅकईव्हेन (युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅरिझोना) यांनीही दुजोरा दिला आहे.मंगळावर जीवनाचा शोध घेण्यासाठी आजवर वैैज्ञानिक सिद्धांतानुसार जो काही समज होता, त्याला ठोस रुप दिले जाते. रोवर्सच्या शोध यात्रेला मोठे यश आले असून तेथील हवेत अधिक आर्द्रता आहे, असे नासाच्या खगोलशास्त्र विभागाने सांगितले.------चार वर्षांपूर्वीही मंगळाच्या पृष्ठभागावर घळींच्या गडद रेघोट्या आढळल्या होता. तथापि, शास्त्रज्ञांकडे ठोस पुरावे नव्हते. नंतर मात्र कळले की, या घळी उन्हाळ्यात वाढायच्या आणि हिवाळा येताच नाहीशा होत. तथापि, घळींच्या या रेघोट्या पाणी प्रवाहाच्याच आहे काय, हे सखोल अभ्यास आणि विश्लेषणाअंतीच सांगता येईल.