पॅरिस : विद्यमान चॅम्पियन वावरिंका आणि रामोस विनोलस यांनी आपापले सामने जिंकताना रविवारी येथे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अल्बर्ट रोमोस विनोलस याने कॅनडाच्या आठव्या मानांकित मिलोस राओनिक याचा ६-२, ६-४, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव करीत पुढील फेरी गाठली. तृतीय मानांकित वावरिंकाने सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोइस्की याचा ७-६, ६-७, ६-३, ६-२ असा पराभव केला. हा त्याचा वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅममधील सलग ११ वा विजय ठरला.महिला गटात स्पेनच्या चौथ्या मानांकित गर्बाइन मुर्गुजाने रशियाच्या १३ व्या मानांकित स्वेतलाना कुज्नेत्सोवा हिचा ६-३, ६-४ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता तिची लढत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सशी होईल. अमेरिकेच्या या मानांकित खेळाडूने रोमानियाच्या २५ व्या मानांकित इरिनाबेगू हिच्यावर ६-३, ६-४ असा सनसनाटी विजय मिळवला. त्याआधी अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याने पावसाचा व्यत्यय आलेल्या फ्रेंच ओपन टेनिस अंतिम १६ जणांत प्रवेश मिळवला आहे. फ्रान्सच्या सहाव्या मानांकित जो विल्फ्रेड सोंगा याला दुखापतीमुळे अर्नस्ट गुलबिसविरुद्ध आपल्या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये निवृत्त व्हावे लागले.एका वर्षात सर्वच चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा आठवा खेळाडू बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने ब्रिटनच्या एलजाज बेडेन याचा ६-२, ६-३, ६-३ असा पराभव केला. त्यानंतर प्रकाश खूपच कमी झाला. दरम्यान, ९ वेळेसचा चॅम्पियन राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्बियन खेळाडू जोकोविचला फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावण्याची मोठी संधी असणार आहे.पेस दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीतभारताचा स्टार खेळाडू लिएंडर पेसने पोलंडचा त्याचा साथीदार मार्सिन मातकोवस्की याच्या साथीने पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.पेस आणि मातकोवस्की या जोडीने १६ व्या मानांकित ब्रुनो सोरेस आणि जेमी मरे या चौथ्या मानांकित जोडीवर ७-६, ७-६ असा सनसनाटी विजय मिळवला. आता त्यांची लढत ब्रायन बंधू बॉब आणि माईक यांच्याशी होईल.>बोपन्ना-मर्जिया उपांत्यपूर्व फेरीतरोहन बोपन्ना आणि रोमानियाचा त्याचा जोडीदार फ्लोरिन मर्जिया या सहाव्या मानांकित जोडीने रविवारी येथे तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मार्कस डॅनियल आणि ब्रायन बेकर यांना नमविताना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.बोपन्ना आणि मर्जिया यांनी पूर्ण सामन्यादरम्यान एकदाही सर्व्हिस न गमावता न्यूझीलंड आणि अमेरिकेच्या अमानांकित जोडीविरुद्ध ६-२, ६-७, ६-१ असा विजय मिळविला. आॅलिम्पिकमध्ये झिका व्हायरसमुळे सेरेना चिंताग्रस्तअमेरिकेची टेनिस स्टार खेळाडू सेरेना विलियम्सने आॅलिम्पिकआधी रिओ शहरातील झिका व्हायरसचा धोका हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे नोव्हाक जोकोविच याने आॅलिम्पिक रद्द करणे अथवा ती स्थलांतरित करण्याची मागणी अवास्तव असल्याचे म्हटले आहे. मी तेथे पूर्णपणे सुरक्षित होऊन जाऊ इच्छिते आणि हाच विचार माझ्या मनात घोळत असल्याचे चौतीस वर्षीय सेरेना म्हटले. रिओ आॅलिम्पिकमधून अनेक टेनिसपटूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु यापाठीमागे आरोग्याच्या चिंतेविषयीचे कारण नाही.
वावरिंका, जोकोविच, रोमोस उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: May 30, 2016 2:53 AM