नवी दिल्ली: चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. याबद्दल चीनची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. चीनमधून पसरल्या कोरोना विषाणूबद्दल अद्याप अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भाष्य केलं नव्हतं. अखेर जगभरातल्या कोरोना रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या आसपास पोहोचला असताना जिनपिंग यांनी मौन सोडलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षित बैठकीत सहभागी झालेल्या जिनपिंग यांनी कोरोना संकटावर भाष्य केलं.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत आम्ही अतिशय पारदर्शकपणे आणि जबाबदारीनं काम केल्याचं जिनपिंग म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेला आणि संबंधित देशांना आम्ही योग्य वेळी कोरोनाबद्दलची माहिती दिली, असं जिनपिंग यांनी सांगितलं. वुहानमधून कोरोना पसरत असताना चीननं त्याबद्दलची माहिती लपवली. त्यामुळे इतर देशांना या संकटाचा सामना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असे आरोप चीनवर झाले आहेत. मात्र जिनपिंग यांनी या आरोपांचं खंडन केलं. कोरोनाबद्दलचा तपास करण्यासाठी ६२ देश एकत्र आले आहेत. यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. या तपासाबद्दलही जिनपिंग यांनी भाष्य केलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या कोरोना तपासाचं आम्ही समर्थन करतो. आम्ही यासाठी तयार आहोत. पण हा तपास निष्पक्ष आणि स्वतंत्र असायला हवा, असं जिनपिंग म्हणाले. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी २ अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. कोरोनावरील पाच लसींवर चीनमध्ये काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण जगाचा विचार करून आम्ही कोरोनावरील लसीवर काम करत आहोत. कोरोनावरील लस सगळ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. विकसनशील देशांना ही लस मिळेल याची काळजी आम्ही घेऊ असं जिनपिंग म्हणाले.सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्रचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्तीचीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना; जागतिक स्पर्धेतील खेळाडूंचा धक्कादायक दावा
CoronaVirus News: कोरोना चौकशीला आमचा पाठिंबा, पण...; चीननं सांगितली महत्त्वाची अट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 7:53 PM