बीजिंग : गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या निर्णयावर आज सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे. सत्तारूढ सरकारने ‘हम दो, हमारे दोे’ अर्थात दोन अपत्यांच्या धोरणास आज अधिकृतपणे मान्यता दिली. जगातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये एक मूल धोरणामुळे अलीकडच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून सरकारने हे धोरणच बदलण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच याबाबत निर्णय झाला होता. एक जानेवारीपासून नवे धोरण अमलात येणार आहे. गत तीन दशकांपासूनचे जुने धोरण यामुळे संपुष्टात येईल. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीत १५९ सदस्यांच्या अनुमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सध्या चीनची लोकसंख्या १ अब्ज ३७ कोटी एवढी आहे. (वृत्तसंस्था)
‘हम दो, हमारे दो’वर चीनमध्ये शिक्कामोर्तब
By admin | Published: December 28, 2015 12:25 AM