मॉस्को : युक्रेनच्या नागरिकांना झोडपून काढू, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिल्याचे वृत्त ब्रिटनच्या वृत्तपत्राने दिले. दोन देशांच्या चर्चेत रशियाचे उद्योगपती रोमन ॲब्रामोविच हे अनौपचारिक दूत म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यांच्याकडे पुतिन यांनी हे उद्गार काढल्याचे समजते.. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दोन्ही देशांतील चर्चेसंदर्भात लिहिलेले एक पत्र ॲब्रामोविच यांनी पुतिन यांना सादर केले. त्यावेळी पुतिन यांनी या उद्योगपतींमार्फत हा जेलेन्स्की यांना इशारा दिला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेत युक्रेनने घातलेल्या अटींची माहिती जेलेन्स्की यांनी पुतिन यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केल्याचे सांगण्यात येते.
रशियाच्या लष्करी छावणीवर क्षेपणास्त्र हल्लाn युक्रेनने रशियाच्या लष्करी छावणीवर मंगळवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनच्या सीमेलगत रशियाच्या बेल्गोरोड या परिसरातील ही छावणी आहे. n या हल्ल्यात रशियाचे चार सैनिक जखमी झाले आहेत. मात्र जीवितहानी झालेली नाही. गेल्या आठवड्यात याच परिसरात युक्रेनने केलेल्या माऱ्यात दोन जण जखमी झाल्याचा दावा रशियाने केला होता.