गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायचे सैन्य हमासमध्ये घुसण्यासाठी सज्ज आहे. आता या संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे, इस्त्रायलचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्झी हावेली यांनी सैन्याला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'मी पंतप्रधान झालो तर संबंध सुधारतील'; कॅनडाचा 'हा' ताकदवान नेता भारताच्या पाठीशी!
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबत नाही. इस्रायली हवाई दल गाझामधील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ५००० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये इस्रायली लष्कर आता गाझा पट्टीमध्ये ग्राउंड ऑपरेशनसाठी सज्ज झाले आहेत.
'आम्ही लवकरच गाझामध्ये प्रवेश करू, तुम्ही तयार राहा, अशा सूचना इस्रायलच्या लष्करप्रमुखांनी सैनिकांना दिल्या आहेत. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासचा नाश होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी म्हणाले, IDF जमिनीवर हल्ला करण्यासाठी सज्ज आहे. आम्ही युद्धात आहोत आणि पुढील कारवाईची पद्धत आणि वेळेबाबत राजकीय क्षेत्रासह एकत्रितपणे निर्णय घेऊ.
लष्कर प्रमुख म्हणाले, या टप्प्यावर धोरणात्मक आणि सामरिक घटक आहेत जे आम्हाला सुधारण्यासाठी अधिक वेळ देत आहेत. आम्ही तयारीसाठी प्रत्येक मिनिटाचा फायदा घेत आहोत. युद्ध नुकतेच सुरू झाले आहे. दुर्दैवाने याची किंमतही आपल्याला चुकवावी लागेल. आपण जसे असायला हवे तसे तयार केले पाहिजे. आपण मानसिक, शारीरिक आणि उपकरणे तयार केली पाहिजे. आम्ही जमिनीवर उतरून हमासचा नाश करू. अन्यथा आपले अस्तित्वच राहणार नाही. ही परिस्थिती आहे, असंही लष्कर प्रमुख म्हणाले.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आयडीएफच्या याहलोम युनिटच्या सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. नेतन्याहू म्हणाले, पुढचा टप्पा समोर उभा आहे, तो येत आहे. आमचे एकच मिशन आहे. हमास नष्ट करणे. ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही.