सेंट पीटर्सबर्ग : बेलारूसमध्ये रशियाने अण्वस्त्रे तैनात केली आहेत. रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास या अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, नाटो देशांपेक्षा रशियाकडे अधिक अण्वस्त्रे आहेत. युद्धात युक्रेनचे सैन्य फार काळ तग धरू शकणार नाही. कीव्हमधील कोणत्याही इमारतीवर आम्ही कधीही हल्ला चढवू शकतो; पण रशिया तसे करणार नाही. मॉस्को व बेलगोरोद येथे हल्ले करून युक्रेन आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही पुतिन यांनी केला.
आफ्रिकी देशांच्या अटी हास्यास्पदआफ्रिकी देशांच्या नेत्यांनी युद्ध थांबविण्यासाठी सादर केलेल्या अटी हास्यास्पद आहेत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले. क्रिमिया येथील राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याची मागणी पुतिन यांच्याकडे करावी, असेही झेलेन्स्की म्हणाले.