जेरुसलेम : गाझातील युद्धसंघर्षात थोडा युद्धविराम घेण्याची तयारी आहे, मात्र शस्त्रसंधी करणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी आणखी पाच जणांची मंगळवारी मुक्तता केली. या दहशतवादी संघटनेने २४० जणांना ओलीस ठेवले आहे. याआधी हमासने जुडिथ रानान (५९ वर्षे) व त्यांची कन्या नताली यांची मुक्तता केली होती.
सीरियामध्ये अमेरिकन लष्करी तळांवर हल्लेउत्तर इराकमधील इरबिल विमानतळावर मंगळवारी तीन हल्ला करणारे ड्रोन पाडण्यात आले. येथे अमेरिकन सैनिक आणि आंतरराष्ट्रीय सैनिक तैनात आहेत. इराकी कुर्दिस्तानच्या काउंटर टेररिझम सर्व्हिसने ही माहिती दिली आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. इराक आणि सीरियामधील अमेरिकन लष्करी तळांवर अनेक आत्मघाती हल्ले झाले आहेत.