रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia Ukraine War) 64 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही युक्रेनवरील संकटाचे (Ukraine Crisis) ढग कमी होण्याचे नाव घेत नाही. रशियाच्या हल्ल्याने युक्रेनमधील अनेक शहरे उध्वस्त झाली आहेत, तर अनेक शहरे ढिगाऱ्याखाली आहेत. कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. दरम्यान, युक्रेनला शस्त्रास्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे रशियाने गुरुवारी म्हटले आहे.
क्रेमलिन प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इतर देशांकडून युक्रेनला अवजड शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे ही एक अशी प्रवृत्ती आहे, ज्यामुळे भविष्यात युरोपची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. युद्धादरम्यान युक्रेनला शस्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेत अस्थिरता निर्माण करते. दरम्यान, दिमित्री पेस्कोव्ह यांनी बुधवारी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना ही माहिती दिली. युक्रेनला अवजड शस्त्रांचा पुरवठा सुरू राहिल्यास युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडोमिर झेलेन्स्की हे रशियन सैनिकांवर कारवाई करण्यासाठी जगभरातील सर्व शक्तिशाली देशांकडून शस्त्रांची मागणी करत आहेत. परंतु युक्रेनला मदत करणारे सर्व देश अशी परिस्थिती टाळू इच्छितात, ज्यामुळे नाटो आणि मास्को यांच्यात थेट संघर्ष होऊ शकेल.
रशियाकडून कारवाईचा इशाराक्रेमलिनच्या प्रवक्त्यापूर्वी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इशारा दिला की, युक्रेन आणि रशियन युद्धात हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील, अशा देशांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे सर्व मार्ग रशियाकडे आहेत. यासोबतच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पाठवू नयेत असेही रशियाने सांगितले आहे.