केनियातील नैरोबी शहरात राहणाऱ्या विल्सन आणि एन. मुटुरा जोडप्याने पैशांच्या टंचाईमुळे आपले लग्न अवघ्या एक डॉलरमध्ये पार पाडले होते परंतु याच जोडप्याने व्हॅलेंटाईन डे साजरा करताना त्यावर २३ लाख रुपये (३५ हजार डॉलर) खर्च केले.पैशांच्या टंचाईमुळे या जोडप्याला आपले लग्न लांबणीवर टाकावे लागले होते. अवघ्या एका डॉलरमध्ये लग्न केल्यानंतर हे जोडपे चांगल्या चर्चेतही आले होते. त्यांच्या शुभचिंतकांनी पैसे गोळा करून व्हॅलेंटाइन डे असा साजरा केला की एका डॉलरमधील लग्नाचा सगळ््यांना विसरही पडला. समाज माध्यमांवर या लग्नाची बातमी व्हायरल झाली होती. विल्सन व एन. मुटुरा यांनी साधारण जिन्स व टी शर्टमध्ये लग्न केले होते. त्यांनी एकमेकांना देण्यासाठी स्टीलच्या अंगठ्या वापरल्या व तेव्हा त्यांच्या लग्नावर एक डॉलर खर्चले होते. परंतु यावर्षी झालेल्या व्हॅलेंटाइन डेला त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता व त्यावर ३५ हजार डॉलर खर्च झाले होते. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाची पार्टी नैरोबीत झाली होती. या जोडप्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांना नवी अंगठी भेट दिली. केनियाचे लोक आता आॅनलाइन प्रश्न विचारत आहेत की लग्नाच्या वाढदिवसावर एवढा प्रचंड पैसा का खर्च केला गेला. हा पैसा खर्च न करता ते कोणा गरजूला आर्थिक मदत करू शकले असते.
लग्न एक डॉलरमध्ये, लग्नाच्या व्हॅलेंटाइन डेसाठी ३५ हजार डॉलर
By admin | Published: April 04, 2017 5:22 AM